Agrowon News

सकाळ ने घेतलेली दखल – जीवामृत थेट ड्रिप मधुन / Use ‘Jeevamrut Filter’ to give through Drip Irrigation

खालील मसूदा सकाळ ऍग्रोवन मध्ये दि. १६ मार्च २०१४ रोजी प्रकाशीत करण्यात आलेला आहे

अॅग्रोवन बातमी 

  • भारतातील पहिलाच प्रयोग ठरण्याची शक्‍यता
  • मजुरी, वेळ, पैसे, श्रम वाचवणारे तंत्रज्ञान
  • शेतकऱ्याने केले संशोधन विकसित

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यातील वडगाव तनपुरे गावचे प्रयोगशील शेतकरी सुभाष तनपुरे यांनी ठिबक सिंचनाद्वारा (ड्रिपद्वारा) शेणखत स्लरी वा जीवामृत देण्याचे अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. वेळ, मजुरी, पैसा व श्रम अशा विविध गोष्टींची बचत करणारे हे तंत्रज्ञान म्हणजे "टॅंक फिल्टर' अर्थात गाळणी यंत्र स्वरूपातील आहे. रासायनिक वा सेंद्रिय, तसेच जिरायती वा बागायती अशा कोणत्याही शेती पद्धतीत त्याची उपयुक्तता असून, अत्यंत सुलभपणे हे यंत्र वापरता येते.

सुभाष तनपुरे हे प्रयोगशील व प्रयत्नवादी वृत्तीचे शेतकरी. नगर जिल्ह्यात जिरायती, कर्जत तालुक्‍यातील वडगाव तनपुरे गावात संयुक्त कुटुंबाची मिळून त्यांची सुमारे सव्वादोनशे एकर शेती. प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून भरीव प्रगती कशी करता येईल, त्यातून समृद्ध कसे होता येईल, या दृष्टीने त्यांनी विविध प्रयत्न केले. पूर्वी त्यांच्याकडे दीडशे म्हशी, 50 गायी, शेळ्या, मेंढ्या एवढा पसारा होता. दुग्ध व्यवसाय तेजीत होता. 

मात्र मजूरसमस्येचा फटका बसून तो थांबवावा लागला. सध्या 20 गायी, चार बैल, दीडशे मेंढरे, 70 शेळ्या एवढे पशुधन त्यांच्याकडे आहे. नवे काही करीत राहण्याची त्यांची ऊर्मीच त्यांना शेतीतील नव्या वाटा दाखवत आहे. त्यातूनच त्यांनी ड्रिपमधून शेणस्लरी देण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच संशोधन असावे. 

आपल्या संशोधनाबाबत तनपुरे म्हणाले, की सध्याचे युग सकस, आरोग्यदायी अन्ननिर्मितीचे असल्याने सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले. या शेतीत शेणखत किंवा जीवामृताचे मोठे महत्त्व आहे. परंतु ते उपलब्ध करायचे तर सकाळी लवकर उठून जनावरांचे शेण-मूत्र काढायचे, शेतात घेऊन जायचे, त्याचा वापर करायचा, त्यासाठी लागणारे श्रम, वेळ, व्याप, मजुरी, खर्च एवढा होता, की "प्रॅक्‍टिकली' हे काम करणे कठीण झाले होते.

यावर उपाय शोधताना मनात विचार आला, की ड्रिपमधून शेणस्लरी वा जीवामृत देता आले तर? तर मग हा सगळाच व्याप वाचेल. मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.  आम्हाला सहज वापरता येईल असे तंत्रज्ञान हवे, अशी शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागली. 

टॅंक फिल्टरनिर्मितीचा ध्यास / Need for the Innovation

टॅंक फिल्टर (टाकी गाळणयंत्र) यंत्रणा तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन अहोरात्र काम करण्यास तनपुरे यांनी सुरवात केली. कल्पकता, संशोधन वृत्ती, चिकाटी कायम ठेवली. आपल्या कल्पनेतील यंत्र बनवण्याचे काम पुणे येथील परिचित प्लॅस्टिक टॅंकनिर्मिती व्यावसायिकांकडे देण्यात आले. अनेक चाचण्या, त्रुटी सुधारत सुमारे चार वर्षांच्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करू शकणारे टॅंकरूपी गाळणी यंत्र तयार करण्यात तनपुरे यांना यश आले. 

कसे आहे गाळणी यंत्र? / What is this product and how does it function?

-"एलएलडीपी" घटक असलेली ही प्लॅस्टिकची टाकी (टॅंक) 
- लांबी साडेसात फूट, रुंदी चार फूट व उंची अडीच फूट. 
- सुमारे 20-25 वर्षे उन्हात टिकाव धरू शकते. 
- टाकीची क्षमता 2100 लिटर 
- दोन व्यक्ती उचलून नेऊ शकतील असे टाकीचे वजन आहे. शेतात आपल्या सोयीनुसार कुठेही ठेवता येते. जागाही कमी लागते. 

गाळणीप्रक्रिया कशी होते?

टाकीत शेणस्लरी वा जीवामृत आल्यानंतर पहिल्या फिल्टरद्वारा गाळण प्रक्रिया सुरू होते. या फिल्टरमध्ये शेणस्लरीतील सर्व प्रकारचा काडीकचरा, चोथा बाजूला होतो. दुसऱ्या फिल्टरमध्ये हे द्रावण येताच तेथे द्रावणातील छोटे घटक अडवले जातात. त्यानंतर टाकीच्या आऊटलेटला आतून असलेल्या चार जाळ्या, त्याबाहेर दोन व व्हेंचुरीजवळ चार जाळ्या, अशा एकूण बारा फिल्टरमधून द्रावण गाळले जाते. त्यानंतर बाहेर येते ते स्वच्छ, पारदर्शक, चोथाविरहित शेणस्लरीचे पाणी. 

रचना व कार्यपद्धती

टाकीची विभागणी (पार्टिशन) दोन भागांत दोन फिल्टरद्वारा (गाळणी) केली आहे. टाकीच्या मुख्य भागात शेणखत, पाणी, गोमूत्र वा जीवामृत आदी घटक टाकता येतात. त्यानंतर गाळण प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होईपर्यंत चार तास थांबावे लागते. त्यानंतर ड्रिपद्वारा शेणस्लरी देण्याच्या कामास सुरवात करता येते. 

Agrowon Page Scan copy

ड्रिपद्वारा कसे द्याल?

विहिरीवरून अगर बोअरवरून "ड्रिप इरिगेशन'साठी येणाऱ्या "मेन पाइपलाइन'ला फिल्टर टाकीच्या पाइपचे कनेक्‍शन देता येते. व्हेंचुरीद्वाराही ते देता येते. द्रावण चोथाविरहित असल्याने ठिबक संचामध्ये ते "चोक अप' होत नाही. 2100 लिटर टाकी ठेवलेल्या जागेवरून दोन ते 25 एकरांपर्यंत हे द्रावण ड्रिपद्वारा पोचवता येते. थोडक्‍यात, विद्राव्य खते ड्रिपद्वारा दिली जातात, त्याच पद्धतीने हे द्रावण शेताच्या कोणत्याही प्लॉटपर्यंत पोचवणे शक्‍य होते. 

 

New Age Farmer Ganesh Satav's Farm - Using Pruthviraj Jeevamrut Filter

TV9 recently covered commendable efforts by Ganesh Satav & his farming Success for Banana plantation

Ganesh Satav being a second generation farmer did not get any formal education in farming when his father handed over the farm to him. He took some time and did his own research over first couple of years. He was quick to realise that using chemical fertilisers is not going to be very economical or effective. Being a businessman primarily he has maintained his farm like a company and hence has calculated each rupee of expense on the farm.

It was then that he found out about ZBNF and Jeevamrut concepts. Without loosing time he changed his methods to use Jeevamrut. When it started to become difficult to use Jeevamrut manually he used 'Pruthviraj Jeevamrut Filter' to automate the Jeevamrut irrigation.

Today he claims that farming can be as rewarding as any other profession. Kudos to this farming hero.  

Product Coverage by Magazine Published by 'Hasan District Planters Association'

We are very proud to announce that our product was recently covered by a magazine published by 'Hasan District Planters Association. The association members had invited our team to their association office in Sakalespur. The aim was to understand the innovative product. Saklespur has mainly Pepper, Coffee and Areca Nut Plantations; for a very long time they have been facing challenge to use Jeevamrut in the big estates. Our team was given a 15 minutes time slot during the association meeting in which we presented the concept and the product. Post understanding the product the association members were convinced with the utility of the product and hence have published in their magazine.

P.S. While the article is in Kannada we would be soon publishing the translation 🙂

Success Story of Pritam Chougule - Using Pruthviraj Jeevamrut Filter

Success Story Covered on Saam TV Mr. Pritam Chougule Using Pruthviraj Filter

Saam TV covered a success story of Pritam Chougule from Aashta Sangli, MH. Pritam underlines the importance of Jeevamrut and Pruthviraj Jeevamrut Filter he uses on his farm. Mr. Chougule also clearly states the challenges he was facing for using Jeevamrut and how he was able to overcome this challenge using Pruthviraj Jeevamrut Filter

Success Story Aajaji Farm near Surat Using Pruthviraj Filter

GTPL NEWS CHANNEL,DD NEWS & TV9 NEWS CHANNEL on 12th May 2017 covered a success story of Jigarbhai Pravinbhai Desai from Valod near Surat, GJ. Pravinbhai speaks of importance of Jeevamrut and the difficulties he faced to give Jeevamrut to the farm. Pruthviraj Filter prove to help him with his effort to create 100% residue free organic fruits on his farm.
Today the Mangoes, Pomegranate, Dragon fruit etc. fruits have been grown and can be exported due to it's high quality.

Success Story Jigarbhai Desai 'Aajaji Farm' - Using Pruthviraj Jeevamrut Filter

Success Story of Balasaheb Gunjal - Using Pruthviraj Jeevamrut Filter

Saam TV coverage of Mr. Balasaheb Gunjal -
Pruthviraj Filter is installed at Mr. Gunjal's Farm

Saam TV covered the success story of Mr. Balasaheb Gunjal on 29th Oct '15 for record production of Oranges. Mr. Gunjal in his interview gives credit to the Pruthviraj Filter installed on his field.

Success Story of Shri. Vitthaldas Maniyar, Nagpur Agrowon_Pune_23rd June 2017